माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
प्रणव मुखर्जी यांनी स्वत: याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी हे रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
प्रणव मुखर्जी म्हणाले की, 'मी एका कामासाठी रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मला लागण झाली असल्याचे समजले. त्यामुळे मागील आठवड्याभरात माझ्या संपर्कात असलेल्या लोकांनी कृपया समोर येऊन माहिती द्यावी आणि स्वत:  क्वारंटाइनमध्ये राहावे' असे  आवाहन प्रणव मुखर्जी यांनी केले.
  Print


News - World | Posted : 2020-08-10


Related Photos