नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या हस्ते साईनगरात वृक्षारोपण व बांधकाम लोकार्पण सोहळा संपन्न


- साईनगरच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे नगराध्यक्षा योगिता पिपरे यांचे प्रतिपादन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील साईनगरात नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या हस्ते वृक्षारोपण व बांधकाम लोकार्पण सोहळा संपन्न झाला. रस्ते, नाल्या व पाणीपुरवठा या मुलभूत सुविधा अभावी येथील वास्तव्याने असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या नगरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत येथील समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
ते साईनगरात पार पडलेल्या वृक्षारोपण व बांधकाम लोकार्पण सोहळा दरम्यान अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, विलास चलाख, मुख्याध्यापक बडगुजर, प्रा. संदिप अजमिरे उपस्थित होते. साईनगरात मुलभूत समस्यांचा अभाव असल्याची बाब नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी लक्षात आणून दिली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे साईनगरात रस्ते, नाली व पाणी आदि विकासकामे करता आले. यापुढेही या नगराच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी आश्वासन दिले.
तर नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी साईनगरातील नागरिकांनी माझावर विश्वास दाववून जे प्रेम दिले त्याच बळावर मी या वार्डातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोटयवधी रूपयांचे विकासकामे खेचून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविका अजमिरे यांनी केले. तर संचालन भूपेंद्र चौधरी तर आभार सोरते यांनी मानले. यशस्वीतेसाठी रूपेश निलमवार, रेवनाथ ठाकरे, नरेश निनावे, अजय बडगुजर, गोविदराव तडस, मोहन भूरसेख, विलास चलाख, डाॅ. अरविंद आलाम, प्रमोद चिलबुले, सुनील कामडी, जालेंद्र सोरते, संतोष मुनघाटे, विनोबा गाऱ्हाटे आदींसह साईनगरातील नागरिकांनी सहकार्य केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-10


Related Photos