महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद गडचिरोली येथील गाडगेबाबांची ६६ वी पुण्यतीथी संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली येथील विर बाबुराव शेडमाके सभागृहात प.पु. गाडगेबाबांची ६६ वी पुण्यतीथी साजरी करण्यात आले. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

२० डिसेंबर २०२२ ला प.पु. गाडगे महाराज यांची ६६ पुण्यतीथी असल्याने विर बाबुराव शेडमाके सभागृह जिल्हा परिषद, गडचिरोली येथे पुण्यतिथीचा कार्यक्रम संम्पन्न झाला. यावेळी शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), कणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उमेश गायकवाड, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, अमित तुरकर कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दयाल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सुनील मडावी उप जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे खाते प्रमुखांच्या हस्ते प.पु. गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांकडुन गाडगेबाबांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आले. व त्याचे कार्य हे समाजासाठी प्रेरणा देणारे असल्याचे शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी व्यक्त केले.

यावेळी नरेश कनोजिया, सहा. प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग, सोनकुसरे, सहा. प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन साई कोडांवार यांना केले तर उपस्थितांचे आभार सारंग गायकवाड यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos