महत्वाच्या बातम्या

 तोडसा ग्राम पंचायतमध्ये भाजप सरपंचा वनिता कोरामी विजयी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / एटापल्ली : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंचा वनिता कोरामी आणि सदस्य प्रशांत आत्राम, विनोद नरोठे, बासु गावडे, ललिता तांडो, प्रतिभा ताई तोडेवार, सर्व भाजपा पैनेलचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.18 डिसेंबर रोजी ग्रापंचायतीसाठी मतदान झाले. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली असून एटापल्ली तालुक्यातील भाजपा पॅनलचे थेट सरपंच आणि सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले. सरपंच म्हणून कु वनिता कोरामी यांचा विजय झाला. निकाल हाती लागताच भाजपा पॅनलच्या कार्यकर्त्यांसह विजयी यात्रा काढली. फटाक्यांचा आतिषबाज करून जल्लोष करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos