बल्लारपूरात अज्ञात व्यक्तीने केला भरदिवसा गोळीबार : एकजण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
येथील जुन्या बसस्टँड परिसरात असलेल्या असलेल्या हॉटेल अरेबियन जवळ अज्ञात व्यक्तीने भरदिवसा गोळीबार केला यात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली . सूरज बहुरीया असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण आहे . सूरज बहुरीया हे आज एमएच ३४- १९५८ क्रमांकाच्या स्विफ्ट कार ने बामणी कडे जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर मुख्य मार्गावरच गोळीबार केला यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबारात त्यांना ५ गोळ्या लागल्याचे बोलल्या जात आहे. 
सूरज बहुरीया यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे रेफर केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सूरज बहुरीया यांचा उद्या ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता असेल बोलल्या जात आहे.
दरम्यान घटनास्थळी एसडीपीओ जाधव व ठाणेदार भगत पोहचले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. 

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-08-08


Related Photos