गडचिरोली जिल्हयात ४ नवे कोरोना बाधित तर दोघेजण झाले कोरोनामुक्त


- एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७१ तर आतापर्यंत ५१० रुग्ण झाले कोरोनामुक्त 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात आज ४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे तर गडचिरोली व वडसा येथील प्रत्येकी एक एक रूग्ण आज कोरोनामुक्त झाले. आज नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णामध्ये गडचिरोली येथील पोलीस कॉलनीतील एक पोलीस कर्मचारी, मूलचेरा येथील एक आरोग्य सेविका, धानोरा तालुक्यातील २ यामध्ये पोलीस स्टेशन धानोरा येथील एक पोलीस व नागपूर येथे उपचारासाठी गेलेला तसेच त्याच ठिकाणी ट्रुनॅट तपासणी केलेला एकजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. यानुसार गडचिरोली १, मूलचेरा १ व धानोरा २ असे ४जण आज कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १६० झाली. तर एकुण बाधित संख्या ६७१ झाली. आत्तापर्यंत एकूण ५१० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-06


Related Photos