वाघनखापासून लॉकेट ब​नविण्यासाठी गेलेला ग्रामसेवक वनविभागाच्या जाळ्यात , वाघाच्या तस्करीचे धागेदोरे भामरागड तालुक्यात


- मूल येथील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
वाघ नखापासून गळ्यात लॉकेट बनविण्यासाठी येथील एका सुवर्णकाराकडे आलेला ग्रामसेवक संजय माधव कुंटावार याला वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कुंटावार गडचिरोली पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावल्यानंतर त्याची बुधवारी जामिनावर सुटका करण्यात आली. या वाघाच्या तस्करीचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असल्याने वनविभाग त्या दिशेने चौकशी सुरू केली आहे.
 संजय कुंटावार याचे मूल शहरात वास्तव आहे. २००५ मध्येत तो गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होता. त्यावेळी त्याने एकाला घरकुलाचे आमीष देत एका व्यक्तीकडून वाघनखे मिळविली.  सोमवारी वाघनखापासून लॉकेट बनविण्यासाठी तो मूल येथील क्रिष्णकांत विठल कत्रोजवार या सुवर्णकाराच्या दुकानात गेला होता. एका वन्यजीव प्रेमीला त्याबाबत माहिती मिळताच त्याने लगेच वनविभागाला कळविले.
वनपाल खनके व वनरक्षक मरसस्कोल्हे यांनी लगेचच ग्रामसेवक कुंटावार याला ताब्यात घेउन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिचपल्ली येथे नेले. चौकशीत त्याने वाघ नखाच्या तस्करीची माहिती दिली असता वन​विभागाने वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक वनसरक्षक एस.एल.लखमावाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्रअधिकारी वैभव राजुरकर करीत आहेत.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-08-06


Related Photos