बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून, वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून ऑक्टोबरमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाते. २०१९ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून  तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे.
 आज शुक्रवार ५ ऑक्टोबर रोजी  राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च आणि दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान होणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsccboard.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर पाहता येईल. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळवले जाईल. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-05


Related Photos