गडचिरोली, आरमोरी आणि एटापल्लीत नवीन प्रतिबंधित क्षेत्र घोषित


- विनापरवाना संचार करण्यास बंदी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोविड - १९ चा वाढता प्रसार लक्षात घेता तसेच रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. आज ४ ऑगस्ट रोजी नवीन प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिरोली, आरमोरी आणि एटापल्ली येथील काही परीसरांचा समावेश आहे.
गडचिरोली येथील पोलिस मुख्यालय काॅलनी, प्रतापगड इमारत, गोदावरी इमारत, मेडीकल काॅलनी मधील शासकीय निवासस्थान क्रमांक ई - २२, शासकीय निवासस्थान क्रमांक ई - ४७, शासकीय निवासस्थान क्रमांक डी - १६, वनश्री काॅलनी मधील संजीवनी शाळेसमोरील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
आरमोरी येथील गायकवाड चैकातील जि. प. केंद्र शाळा ते आझाद चौक जाणारा रस्ता, गायकवाड चैक ते सिध्दार्थ वार्ड रस्त, आझाद चौक ते शक्तीनगर रस्ता, गुजरी चौक रस्त, विठ्ठल मंदिर वार्डातील रामनगर शहर विभाग रोड, शिवाजी चौक ते डोंगरी रस्ता, महात्मा गांधी शाळा ते शिवाजी चौक , डोंगरी रस्ता ते मानी मोहल्ला रस्ता, कोरेगांव टोली येथील डोमेश्वर टेंभुर्णे यांचे शेत, उदाराम उसेंडी यांचे शेत, ग्रामपंचायत गुरांचा कोंडवाडा, परसवाडी रोड, सुकाळा येथील इंदिरा आश्रमशाळा, निलकंठ राउत यांचे घर, मोहझरी आणि मेंढेबोडी रोड प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
एटापल्ली येथील युवराज बालाजी मानापुरे यांच्या घरापासून ते महादेव मेश्राम यांच्या घरापर्यंत , सतिश सुलवावार यांच्या घरापासून गोमी दासरवार यांच्या घरापर्यंत, बबीता मनकु कोरामी यांच्या घरापर्यंत, मोतीराम रूपी गावतुरे यांच्या घरापासून ते पुंडलिक बालाजी गावतुरे यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-04


Related Photos