भाजीपाला विक्रेती महिला, वेल्डिंग दुकानदारासह गडचिरोली जिल्ह्यात आढळले २९ कोरोना बाधित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात आज १ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार एक भाजीपाला विक्रेती महिला तसेच वेल्डिंग दुकानदारासह २९ जण कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. 
 जिल्ह्यात आज सीआरपीएफ अहेरी येथील बटालीयनचे १० नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच धानोरा पोलीस स्टेशन मधील १३ , गडचिरोली येथील एक महिला व एक भाजी विक्रेता, जिल्हा सामान्य रूग्णालयातील दोन कर्मचारी, आष्टी येथील एक वेल्डींग दुकानदार व विलगीकरण्यातील जम्मू कश्मिर येथून परतलेला एकजण कोरोना बाधित आढळून आला. 
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १८१ झाली. तर एकुण बाधित संख्या ६०६ झाली. आत्तापर्यंत एकूण ४२४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-01


Related Photos