गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीव्दारे चिनी मोबाईल ॲपचा सर्रासपणे वापर


- पत्रव्यवहार करतांना पत्राचे स्कॅन कॅम स्कॅनर या चिनी मोबाईल ॲपव्दारे 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना महामारिच्या काळानंतर भारत आणि चीन सिमेवर काही काळ तणाव निर्माण झाला होता. आणि चिनची मनमानी रोखण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा समस्त देशवासीयांना दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत चीन कडून आयात होणाऱ्या वस्तू, चीनमध्ये निर्माण होणारे उत्पादन आणि भारतात उपयोग होणाऱ्या वस्तंवर तसेच मोबाईल बंदी घालण्याचा निर्णय केंद्र शासनाव्दारे ३ जुलै २०२० रोजी घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदयाअंतर्गत जनतेच्या माहितीच्या सुरक्षिततेकरिता भारत सरकारने प्रथम चरणात तब्बल ५९ चिनी मोबाईल ॲपवर बंदी घातलेली असून त्या संदर्भात जनतेला विविध प्रसार माध्यमातून माहितीसुध्दा शासनाने जनतेला दिलेली आहे. ज्या ५९ चिनी ॲपवर देशात बंदी घालून देण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने कॅम स्कॅनर या प्रमुख मोबाईल ॲपचा सुध्दा समावेश आहे.
ही संपूर्ण माहिती समस्त भारतीय जनतेला असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मात्र या बाबी पासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून विविध बाबतील होणारा पत्रव्यवहार हा अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या पत्राचे कॅम स्कॅनरने स्कॅन करून ती पत्रे संबंधित व्यक्तीना, महाविद्यालयांना व विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकण्यात येतात ही मोठी चितेची बाब आहे. ज्या उद्देशासाठी केंद्र शासनाने या ॲपवर बंदी घातलेली आहे त्याच बाबीचा मोठया प्रमाणत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीव्दारे उल्लंघन होत असून अनेक गोपनीय असलेल्या बाबी या ॲपमुळे धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-01


Related Photos