वडसा येथे आढळले ४ नवे कोरोना बाधित तर धानोरा येथील ४ व गडचिरोली येथील एकजण झाला कोरोनामुक्त


- दिवसभरात ९ जण कोरोनामुक्त तर १२ पॉझिटिव्ह
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वडसा येथील आंबेडकर नगर येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील सकाळी ५ नंतर आता पुन्हा ४ कोरोना बाधित आढळून आले. तर जिल्ह्यात आज सकाळी ४ तर आता पुन्हा ५ जण कोरोनामुक्त झाले आहे. यात धानोरा येथील ४ व गडचिरोलीतील एकजणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७५ झाली तर सध्या सक्रिय रुग्ण २३२ आहे तर आतापर्यंत जिल्ह्यात ३४२ कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्याबाहेर ०१ मृत्यूची नोंद आहे.
News - Gadchiroli | Posted : 2020-07-30