अभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
जिल्हा  प्रतिनिधी / वर्धा :
तनुश्री दत्ता हिने मुंबई येथे २७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे पक्षाचा उल्लेख गुंडांची पार्टी असा केल्याने  अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यावर वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शुक्रवारी मनसेचे तालुका अध्यक्ष प्रशांत झाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. 
तनुश्री दत्ता हिने मुंबई  घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे पक्षाचा उल्लेख गुंडांची पार्टी असा करत  तनुश्रीने या पत्रपरिषदेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याचे झाडे यांनी नमूद केले आहे.  सेलूचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. यावेळी पोलीस ठाण्यात मनसेचे वर्धा शहरातील व सेलूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या तनुश्री नाना पाटेकरवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे.
   Print


News - Wardha | Posted : 2018-10-05


Related Photos