महत्वाच्या बातम्या

 संत मानवदयाल विद्यालय अहेरी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुका विधी सेवा समिती अहेरी तर्फे संत मानवदयाल विद्यालय अहेरी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 

सदर कार्यक्रमाला अमोल कुमार अ. देशपांडे अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती (दिवाणी न्यायाधीश क. स्तर न्यायदंडाधिकारी) अहेरी हे उपस्थित होते. तसेच रूपाली माकडे सदस्य अधिवक्ता संघ अहेरी, गणेश बोगामी सदस्य अधिवक्ता संघ अहेरी, तसेच मुख्याध्यापक प्रणय बी. येगलोपवार उपस्थित होते. सध्या काळात वयोगट 14 आणि जे लहान मुलावर होणारे अत्याचार, लैंगिक अत्याचार यावर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये अमोल कुमार यांनी बालहक्क संरक्षण कायदा सन 2005 याबद्दल यांनी माहिती दिली आणि मुलांना लैंगिक शिक्षण हे गरजेचे आहे. याबद्दल त्यांनी समजावून सांगितले.

यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos