सागवान तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक, दुचाकींसह सागवानी लठ्ठे जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /सिरोंचा :
सिरोंचा - आलापल्ली मार्गावर दुचाकीवरून सागवानाची तस्करी करीत असताना ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन दुचाकी तसेच लठ्ठे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
इशाक बापू दुर्गम (२५) , विनोद उर्फ राकेश स्वामी दुर्गम (२५) , राजेंद्र बकन्ना दुर्गम (१९) आणि संजयसिंग रामक्रिपालसिंग राठोड (२९) सर्व रा. सूर्यापल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२६ जुलै रोजी रात्री सिरोंचा येथील वनपरीक्षेत्र कार्यालयात मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमडेली जंगलात गस्तीवर असताना दोन दुचाकीने ४ इसम सागवानी लठ्ठे घेवून जाता आढळून आले. आरोपींना थांबवून चौकशी केली असता सागवान तस्करी केली जात असल्याचे आढळून आले. आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच घटनास्थळावरून एमएमच ३४ जे ३६९१ व एपी १  के १७८५ , ०.१७४  घनमीटर १० हजार ४३६ रूपये किमतीचे सागवानी लठ्ठे जप्त करण्यात आले. 
आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी खंड क्रमांक १८४ या राखीव वनामध्ये सागवान लाकडांची तोड केली. याबाबत मोका चौकशी करण्यात आली. घटनास्थळावर तोडलेल्या मालाची मोजणी केली असता ०.१९७ घनमीटर म्हणजे ११ हजार ८१६ रूपये किमतीच्या झाडांची तोड करण्यात आली. घटनेत वापरलेले इतरही साहित्य जप्त करण्यात आले. 
सदर कार्यवाही उपवनसंरक्षक सुमितकुमार, सहाय्यक वनसंरक्षक एस.जी. बडेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी वि.वा.नरखेडकर, क्षेत्रसहाय्यक बी.एम. खोब्रागडे, एल.एम. शेख, वनरक्षक बी.एम. नरोटे, आर. व्ही. जवाजी, डी.जी. भुरसे, पी.डी. कोडाप, एम.जे. धुर्वे, आर.वाय. तलांडी, एस.टी. तुलावी, आर.एस. पदा, वाहनचालक वाय. आर. गुणशेट्टीवार यांनी केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-28


Related Photos