येलदडमी येथील चकमकीत नक्षल डेप्यूटी कमांडर अमोल होयामी याचाही झाला खात्मा


- नक्षली पत्रकातून मिळाली माहिती
- चकमकीनंतर कमांडर सोमा शंकर चे प्रेत लागले होते पोलिसांच्या हाती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
३ जुलै रोजी हेडरी उपविभागांतर्गत येत असलेल्या येलदडमी जंगलात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत पेरमिली दलम कमांडर सोमा उर्फ शंकर हा ठार झाला होता. आता याच चकमकीत गट्टा दलमचा डेप्यूटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुध्दा ठार झाल्याची माहिती नक्षली पत्रकांमधून मिळाली आहे. या चकमकीत किमान दोन ते ३ नक्षली ठार झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने व्यक्त केला होता.
३ जुलै रोजी सी - ६० कमांडो जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविताना चकमक उडाली होती. या चकमकीनंतर शोधमोहिम राबविली असता एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आला होता. तर घटनास्थळावरील परिस्थितीवरून आणखी दोन नक्षली ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. 
जहाल नक्षली अमोल होयामी हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील भैरागड येथील रहिवासी होता. तो २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये दाखल झाला. त्यानंतर गट्टा दलमचा डेप्यूटी कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर शासनाने ६ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. दोन्ही नक्षल्यांना कंठस्नान घातलेल्या सी - ६० जवानांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-28


Related Photos