महत्वाच्या बातम्या

 युवामंचच्या मदतीने युवकांचे वाचले प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : रात्रौ उशिरा आरमोरी वरून वडसा जाणारे व्यावसायिक सागर झुरमुरे यांना अचानक कासवी फाट्याजवळ अपघात झाले दिसले, लगेच त्यांनी आपले वाहन बाजुला थांबुन विचारपुस केली असता आमगाव येथील अरविंद मांडाळे आणि नितेश अलबनकर हे दोन युवक गाडी सोबत नाल्यात पडल्याचे कडले. नंतर सागर भाऊ यांनी लगेच आरमोरी येथील युवामंच चे कार्यकर्ते नंदु नाकतोडे यांना घटनेची माहिती देत झालेला प्रकार सांगितला व सागर यांनी स्वतःच्या चारचाकी वाहनातून एका रुग्णाला आरमोरी येथील उपजिल्हा  रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर लगेच युवामंच चे सदस्यानी आरमोरी पोलिस स्टेशन चे निरीक्षक काळबांडे साहेब यांना घटनेची माहिती दिली आणि  घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन गेले व दुसऱ्या रूग्णाला सुद्धा रुग्णालयात दाखल केले. दोन्ही रुग्ण गंभीररीत्या जखमी होते त्यामुळे त्यांना आरमोरी येथील उपजिल्हा  रुग्णालयात डॉ. मारभते यांच्याकडून प्रथोमोपचार करण्यात आले परंतु त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना लगेच ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात हलवायचे होते परंतु १०८ रुग्णवाहिकेने खासगी रुग्णालयात रुग्णांना हलविण्याची अडचण होत होती त्यामुळे युवामंच च्या सदस्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न करता आरमोरी शहरात नुकतीच आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्या मदतीने दाखल झालेल्या रुग्णवाहिकेने ब्रम्हपुरी येथील खासगी रग्णालयात दाखल करण्यात आले.

आता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही रुग्णांची स्थिती आता धोक्याबाहेर आहे. युवामंच च्या सदस्यांची मदत वेळीच मिळाल्याने आज त्या दोन्ही रुग्णांचे प्राण वाचू शकले, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी युवामंचच्या  नंदू नाकतोडे, पंकज खरवडे, जितू ठाकरे, अमोल खेडकर, अमित राठोड या सदस्यांचे आभार मानले





  Print






News - Gadchiroli




Related Photos