महत्वाच्या बातम्या

 वरिष्ठ हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष व महिलांमध्ये नागपूर संघ विजयी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे जयंती निमित्त स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थावरोरा व महारोगी सेवा समिती आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतर जिल्हा वरिष्ठ गट व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्हा संघाने पुरुष व महिलांचे अजिंक्यपद पटकाविले.

चार दिवस चाललेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुषांचे 34 तर महिलांचे 20 संघ सहभागी झाले होते. पुरुषांच्या अंतिम सामन्यात नागपूर जिल्हा संघाने मुंबई उपनगर जिल्हा संघावर मात केली, तर महिलांमध्ये नागपूर जिल्हा संघाने नाशिक जिल्हा संघाचा पराभव केला. महिलांमध्ये तृतीय स्थान मुंबई शहर जिल्हा संघ तर पुरुषांमध्ये मुंबई शहर जिल्हा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे यांच्याकडून मॅन ऑफ द टूर्नामेंट वुमन ऑफ द टूर्नामेंट यांना दोन दुचाकी वाहन पारितोषिक म्हणून दिले. पुरुष गटात नागपूर जिल्हा संघाचा राहुल पोतराजे तर महिला गटात नागपूर जिल्हा संघाची जयश्री ठाकरे याचे मानकरी ठरले. स्पर्धेदरम्यान आमदार प्रतिभा धानोरकर, महारोगीसेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे, आनंदनिकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे, संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडसे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, महाराष्ट्र वॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप ठाकरे, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉक्टर विजय पोळ, कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, युवा नेते तथा उद्योजक किशोर टोंगे, निवृत्त न्यायाधीश अशोक मते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अह ते श्याम अली आदी मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. 

डॉक्टर विकास आमटे यांनी वयाचे 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार बाळू धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या समारोप विदर्भ लावणी क्वीन रजनी नागपूरकर, सब टीव्ही फेम अनकोर भाविका, अंशिका चोनकर, बॉलीवूड सिंगर राहुल सक्सेना, बॉलीवुड सिंगर प्रिया पाटीदार या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस हिंदी व मराठी गाणे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्धकेले स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आनंदवन निर्मित स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था चे पदाधिकारी व स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी खेळाडू कार्यकर्ते महारोगी सेवा समितीचे विश्वस्त व कार्यकर्ते तसेच आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी व खेळाडूंनी परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos