गडचिरोली जिल्ह्यात आज आढळले ७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण तर दोघांनी केली कोरोनावर मात


- एकूण रुग्णसंख्या झाली ५१८ तर आतापर्यंत २५६ जणांनी केली कोरोनावर मात, सध्या सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण २६१ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील विलगीकरणात असलेल्या ६ एसआरपीएफ जवान व वर्धा येथून आलेल्या एका जणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला आहे तर  गडचिरोली येथील एक व वडसा येथील एक अशा दोघांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली.  नव्याने आढळलेल्या ७ रूग्णांमुळे जिल्हयातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ५१८ झाली आहे तर आज जिल्यातील दोघा जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्हयातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या २५६ एवढी झाली आहे. सध्या जिल्हयातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या २६१ एवढी आहे तर एकाचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-27


Related Photos