गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांची धानोरा पंचायत समितीला आकस्मिक भेट


- कोविड-१९ सह विविध विकास कामांवर केली चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार आणि उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी आज, २१ जुलै रोजी पंचायत समिती धानोराला अचानक भेट दिल्याने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी अव्वाक झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी धानोरा तालुक्यातील कोविड - १९ या साथरोगाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच पंचायत समिती अंतर्गत होत असलेली विकास कामे, नरेगा, बियाणे, खत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील रिक्त पदे, आरोग्य आणि नरेगावर भर देण्याचे निर्देश अध्यक्ष कंकडालवार आणि उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आणि तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटायझर आणि मॉस्क वितरित करून गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, संवर्ग विकास अधिकारी निमसरकर. कर्मचारी व आविसंचे श्रीकांत बंडामवार, शिवराम पूल्लूरी, मिथुन देवगडे उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-22


Related Photos