महत्वाच्या बातम्या

 उघड्यावर शिळे अन्न फेकुन अस्वच्छता : कॅटरर्सला १० हजारांचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने जेलच्या मागील भागात उघड्यावर शिळे अन्न फेकुन कचरा केल्याने संबंधीत कॅटरर्स कडुन १० हजार रुपयांचा दंड तर सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या नागरिकांकडून २ हजार रुपये दंड वसुल केले आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आले आहे.

यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज निश्चितच वाटते. स्वच्छता ही स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकीच आपलीही जबाबदारी आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहेत. दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे, हा यामागचा हेतू आहे. स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 






  Print






News - Chandrapur




Related Photos