व्हॉल्व असलेल्या एन ९५ मास्क बिनकामाचा, केंद्र शासनाच्या सर्व राज्यांना पत्र


- नागरिकांना व्हॉल्व असलेला एन ९५ मास्क न वापरण्याचे केले आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र जर तुम्ही कोरोनापासून वाचण्यासाठी N-९५ मास्कचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आहे. कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता सरकारने मास्कबाबत एक निर्देशक जारी केले आहे. यात N-९५ मास्क धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारचे आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून N-९५ मास्कचा वापर थांबवण्यास सांगितले आहे. सरकारने सांगितले आहे की, N-९५ मास्क मधील व्हॉल्व्ह कोरोनाव्हायरसला बाहेर काढण्यास मदत करत नाही. N-९५ मास्क कोरोना संसर्ग रोखण्यात पूर्णपणे अपयश ठरला आहे.
केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून लोकांकडे व्हॉल्व्ह असलेले N-९५ मास्क न वापरण्याबाबत आदेश जारी करण्यास सांगितले आहे. यात असे म्हटले आहे की, या मास्कमुळे विषाणूचा प्रसार थांबणार नाही. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहून म्हटले आहे की, लोकं N-९५ मास्काचा वापर अयोग्य पद्धतीने करत असल्याचे उघडकीस आले आहे.
गर्ग यांनी लोकांना आवाहन केले की, "तुम्हाला सांगण्यात येत आहे की, व्हॉल्व्ह असलेले N-९५ मास्क कोरोनाचा प्रसार रोखण्यात असमर्थ असून याउलट या मास्कमधून व्हायरस बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे मी विनंती करतो की, N-९५ मास्काचा वापर करू नका".
सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार कोरोना टाळण्यासाठी ट्रिपल लेयर मास्कचा वापर करणे सर्वात सुरक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) देखील ट्रिपल लेयर मास्क व्हॉल्व्ह मास्कपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वर्णन केले आहे आणि या संदर्भात संस्थेने जगभरातील देशांना मार्गदर्शक सूचना देखील जारी केली आहेत. हेच कारण आहे की डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आता N-९५ मास्कसहसह ट्रिपल लेयर गुण वापरत आहेत.
News - World | Posted : 2020-07-21