रामनगर गुन्हे शोध पथकाने केला बनावट सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्धवस्त : ५० लाख ३३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
रामनगर गुन्हे शोध पथकाने २० जुलै रोजी बनावट सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्धवस्त करून ५० लाख ३३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बनावट अवैधरित्या सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील चिचपल्ली दूरक्षेत्र भागातील वलनी ते चेक निबाळा रोडलगत असलेलया फाॅर्महाऊसमध्ये शशीम प्रेमानंद कांबळे हा आपले फाॅर्महाऊसवरती बाहेरुन मजा, ईगल व हुक्का असे कंपनीचे सुगंधित तंबाखू आणून ते एकमेकात भेसळ कस्न मजा सुगंधित तबाखूच्या डब्यात भरून सिलबंद करून तो सुगंधित तंबाखू मजा म्हणून अवैधरित्या विक्री करीत असतो, अशी गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होताच सदर माहिती चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर व रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांना देण्यात आली. सदर कार्यवाहीकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर, पोलिस निरीक्षक प्रकाश हाके, गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी व पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी हे गेले असता कार्यवाहीदरम्यान मुद्देमाल आढळून आला. यामध्ये ३ लाख ६२ हजार ४०० रुपये किंमतीचा मजा कंपनीचे १०८ असे लिहिलेले सुगंधित तंबाखूचे खरड्याचे खोक्यात सिलबंद असलेले ३०२ डब्बे, ७ लाख २० हजार रुपये किंमतीचे ईगल कपनीचे सुगंधित तंबाखू असलेले पाॅकेट ९ प्लास्टिक जुंगडीमध्ये प्रत्येकी २०० पाॅकेटप्रमाणे एकूण १८०० पाॅकेट, १ लाख ६० हजार रुपये किंमतीची टाटा कंपनीची जुनी वापरते वाहन (क्रमांक एमएच ३४ बीजी ४९२८) व २ प्लास्टिक चुंगडीमध्ये प्रत्येकी २०० पाॅकेटप्रमाणे ४०० पाॅकेट, २ हजार ६०० रुपये किंमतीचे एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक चुंगडीत १३ किलो खुले तंबाखू, ३ हजार ३०० रुपये किंमतीचे कुतूबमिनार हुक्का कंपनीचे सुगंधित तंबाखूचे ११ पाॅकेट, २९ हजार रुपये किंमतीची जुने ईगल कंपनीच्या सुगंधित तंबाखूच्य पाॅकेटमध्ये बारीक सुपारी, ८० हजार रुपये किंमतीचा पांढरया रंगाच्या १६ प्लास्टिक चुंगडीमध्ये खुले सुगंधित तंबाखू, १ लाख ५० हजार रुपये किंमतीची सिल्व्हर रंगाच्या बारीक सुपारी असलेल्या पाॅकेटमध्ये १५ प्लास्टिक चुंगडीमध्ये ३७६ किलो सुपारी, १ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे सोनेरी रंगाच्या बारीक सुपारी असलेले पाॅकेट, १० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाच्या पाॅकेटमध्ये २० किलो बारीक सुपारी, २ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे ५७० पाॅकेट, २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे हिरव्या-निळ्या रंगाची काॅर्टून बाॅक्स पॅक करण्याची मशीन, ३५ हजार रुपये किंमतीची प्लास्टिक चंुगडीत शिलाई मारण्याची मशीन, १ लाख ५५ हजार रुपये किंमतीची मजाचे डब्बे पॅक करण्याची मशीन, १ लाख ५५ हजार रुपये किंमतीची एकडममज कंपनीची डब्बे सिल करण्याची लोखंडी मशीन, २० हजार रुपये किंमतीची प्लास्टिक पाउच सिल करणची लोखंडी मशीन, ३ लाख १० हजार रुपये किंमतीची दोन मजाचे सुगंधित तंबाखचू डब्बे सिल करण्याची मशीन, ३० हजार रुपये किंमतीचे दोन वजन माप करण्याचे इलेक्ट्रानिक तराजू, ५० हजार रुपये किंमतीचे मजा डब्यात सुगंधित तंबाखू भेसळ केल्यानंतर लावण्याचे नवन झाकन, २५ हजार रुपये किंमतीचे मजा बाॅक्स तयार करण्याचे खरडे, ५० रुपये किंमतीचे जुने वापरलेले स्टॅम्प पॅड, १ हजार ५० रुपये किंमतीचे वेगवेगळे दर नमूद असलेले ७ रबरी स्टॅम्प, २० रुपये किंमतीचे एक प्लास्टिक लहान स्केल, ५० रुपये किंमतीची कॅमल कंपनीचे पॅड इन्क बाटल, २ हजार ४०० रुपये किंमतीचे तीन वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक टप, १ हजार रुपये किंमतीचे मजाचे फोडलेले जुने टिनाचे रिकामे डब्बे, २० लाख रुपये किंमतीची टाटा कंपनीची जुनी वापरती वाहन क्रमांक असा एकूण ५० लाख ३३ हजार ८७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शशीम प्रेमानंद कामळे (४८) रा. चेक निबाळा, जि. चंद्रपूर, शैलेश जग्गनाथ पटेल (३३) रा. लालपेठ माता नगर चौक चंद्रपूर, मोहम्मद अब्दुल उर्फ शहादाब रौफ शेख (३३) रा. बल्लारशा पेपर मिल, जि. चंद्रपूर या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील आरोपीने लाॅकडाउनदरम्यान नकली सुगंधित तंबाखू तयार करून चंद्रपूर व बल्लारशा बाजारपेठेमध्ये विक्री करीत होते. सदर कारवाई चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रकाश हाके, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, विठ्ठल मोरे, पोलिस हवालदार मनोहर कामडी, रजनीकांत पुठ्ठावार, नाईक पोलिस शिपाई संजय चौधरी, सुरेश कसारे, पोलिस शिपाई विकास जुमनाके, सतीश अवथरे यांनी केली आहे. या कारवाई अवैधरित्या सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-07-20


Related Photos