गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ कुमार आशीर्वाद यांचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी केले स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड यांच्या स्थानांतरणानंतर सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याकडे प्रभारी सीईओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून बदली करण्यात आली. त्यामुळे येथील मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुमार आशीर्वाद हे रुजू झाले आहेत. त्यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य ॲन्ड. राम मेश्राम, जगन्नाथ पाटील बोरकुटे व अन्य जिल्हा परिषद सदस्यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी नवनियुक्त सीईओ कुमार आशीर्वाद यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-20


Related Photos