गोंदिया जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक व पोलीस शिपाई अडकला एसीबीच्या जाळयात : ४ हजार रूपयांची स्वीकारली लाच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
अवैध दारू विक्रीच्या व्यवसायावर कायदेशीर कार्यवाही न करण्याकरिता ४ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याने गोंदिया पोलिस स्टेशन ग्रामीण येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मुकुंद पवार, व पोलिस शिपाई शरद प्रकाश चव्हाण यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. सदर कार्यवाहीमुळे पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनूसार तक्रारदार हे ग्राम पांढराबोडी ता. जि. गोंदिया येथील रहिवासी असून त्यांचा हाॅटेलचा व्यवसाय असून त्या माध्यमातून ते अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करत असतांना गोदिंया पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पवार हे आपल्या स्टाॅफसह आले असता त्याठिकाणी त्यांना दारू मिळून आली नाही . परंतू हाॅटेल कप्पाउंडच्या बाहेर पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या पाहून त्यांनी तक्रारदारास ते अवैध दारू विक्रीचा धंदा करतात, त्यांच्याविरूध्द दारूबंदी कायादयान्वये कार्यवाही न करण्याकरीता तक्रारदाराकडे २ हजार रूपये व मासिक हप्ता म्हणून मागणी केलेली लाच रक्कम १० हजार रूपये असे एकुण १२ हजार रूपये लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदारास सदर लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी पोलिस शिपाई शरद चव्हाण याच्या विरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा केली . त्यामध्ये ४ जूलै २०२० रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान पोलिस स्टेशन गोंदिया येथे आरोपी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मुकुंद पवार व पोलिस शिपाई शरद प्रकाश चव्हाण पोलिस स्टेशन गोंदिया यांनी तक्रारदारास अवैध दारू विक्रीचा व्यवसायावर कायदेशीर कार्यवाही न करण्याकरीता ऑगस्ट महिन्यापासून ८ हजार रूपये मासिक हप्ता लाच रकमेची मागणी केली व चालू महिण्याकरीता ४ हजार रूपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला त्यावरून त्यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन गोंदिया येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेष दुदलवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, स.फौ. शिवशंकर तुंबळ, पो.हवा. विजय खोब्रागउे, प्रदिप तुळसकर, राजेश शेंद्रे नापोशि, रंजित बिसेन, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, डिगांबर जाधव, मनापोशि वंदना बिसेन व चालक पो.हवा. देवानंद मारबते यांनी केली आहे.
  Print


News - Gondia | Posted : 2020-07-19


Related Photos