दुर्गापूर येथे थोरल्या भावाने धाकट्याला दारू पाजून व गळफास लावून केला खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरले खड्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक दुर्गापूर वार्ड क्रमांक १ येथील थोरल्या भावाने धाकट्या भावाला अन्य दुसर्याच्या घरी बोलावून दारू पाजली व गळफास लावून त्याची हत्या केली. शिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी पूर्वीच खोदून ठेवलेल्या खड्यात मृतदेह पुरण्यात आल्याची घटना पुढे आली असून या घटनेमुळे वाॅर्डात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, दुर्गापूर वार्ड क्रमांक १ (ता. जि. चंद्रपूर) येथे आकाश रामटेके याच्या घराच्या मागील सांदवाडीत कवेलु ठेवून असलेल्या ठिकाणी मानसाच्या हाताचे हाडासारखे काहीतरी दिसत असून त्यावर कवेलु ठेवून असल्याची माहिती १३ जुलै २०२० रोजी देवानंद जयवंतराव थोरात (५४) रा. दुर्गापूर यांनी पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे येवून पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांना दिली. यावरून पोलिस निरीक्षक खोब्रागडे हे सहायक पोलिस निरीक्षक बावनकर, पोलिस उपनिरीक्षक सोनोने, पोलिस हवालदार, नाईक पोलिस शिपाई, पोलिस शिपाई, महिला पोलिस शिपाई यासह घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यावेळी जमिनीवर ठेवलेल्या कवेलुच्या खाली मानवी हाताचे हाडासारखे हाड दिसून आले. त्या ठिकाणी मानवी प्रेत पुरुन ठेवले असल्याची दाट शक्यता आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने व अंधार असल्याने कार्यवाही नसल्याने सदर क्राईमशीन प्रिझर्व करून ठेवण्यात आले व गार्ड लावण्यात आले. याबाबत पोलिस अधीक्षक यांना माहिती देवून मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकरी यांचे मार्गदर्शन घेतले. रात्रीच्या दरम्यान तपासाची चक्रे फिरविण्यात आली असता गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की, दुर्गापूर वार्ड क्रमांक १ मध्ये राहणारा अनिकेत ऊर्फ गोलु विपूल रामटेके हा मागील १० ते १२ दिवसांपासून बेपत्ता असून वस्तीत फिरताना दिसत नाही. अनिकेत विपुल रामटेके (१७) हा बेपत्ता असून त्याचा मोठा भाऊ गुन्ह्यातील आरोपी अंकित विपूल रामटेके (२१) हा सुद्धा फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनिकेतबाबत त्याची आई श्रीमती वंदना विपुल रामटेके हिला विचारणा केली असता मोठा मुल गा अंकितने मृतक अनिकेत हा बाहेरगावी काम करण्यासाठी गेल्याचे सांगितल्याचे तिने म्हटले. अनिकेतने आईला काम करण्यासाठी जातो असे काहीही सांगितले नव्हते. हा मुद्दा पोलिसांना संशयास्पद वाटला. यावेळी अंकित हा वस्तीत मिळून आला नाही. पोलिस घटनास्थळी गेले त्यावेळी तो वस्तीमधून फरार झाला. आरोपीने स्वतःच्या योजनेप्रमाणे मृतक अनिकेत ऊर्फ गोलु याला सत्यवान रामटेके याच्या घरी बोलावून खूप दारू पाजली व गळफास लावून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पूर्वीच खोदून ठेवलेल्या खड्यात प्रेत पुरल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली. आज १४ जुलै रोजी कार्यकारी दंडाधिकारी गादेवार आणि पंचासमक्ष मृतदेह उत्खनन केले व पंचनामा केला. सदर गुन्हा पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दीपक खोबागडे, सहायक पोलिस निरीक्षक बावनकर, पोलिस उपनिरीक्षक सोनोने, पोलिस हवालदार खेडेकर, पोलिस हवालदार चव्हाण, पोलिस हवालदार माहुलीकर, नाईक पोलिस शिपाई उमेश, नाईक पोलिस शिपाई योगराज, नाईक पोलिस शिपाई जयसिंग, पोलिस शिपाई मनोहर, महिला पोलिस शिपाई भाग्यश्री, महिला पोलिस शिपाई कुमूद यांनी मेहनत घेवून २४ तासांच्या आत उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-07-14


Related Photos