वीज पडून एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी : आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील डोंगरसावंगी येथील शेतशिवारामध्ये वीज कोसळल्याने वडधा येथील एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, १३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, वडधा येथील दोन मुले शेतामध्ये काम करत होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामध्ये जोरात विजांचा कडकडाट झाला व अचानकपणे वीज यश येनुधा राऊत (१५) व मनीष किशोर राऊत (१६) दोघेही रा. वडधा हे जेवण करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये यश येणुधा राऊत हा जागीच ठार झाला तरमनीष किशोर राऊत गंभीर जखमी झाला. जखमी महेश यास उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दाखल करण्यात आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-13


Related Photos