महत्वाच्या बातम्या

 कोकडी येथे भव्य रात्रकालीन अमर्याद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन


- आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते प्रतिपादन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील कोकडी या ठिकाणी १५ डिसेंबर २०२२ ला मित्रांना सार्वजनिक माऊली क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोकडी यांच्या सौजन्याने भव्य रात्रकालीन अमर्याद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, रोषणी पारधी जि.प. सदस्य, परसराम टिकले, सुनील पारधी ओबीसी जिल्हाध्यक्ष, केवळराम टिकले सरपंच कोकडी, चक्रधर नाकाडे सरपंच तुळशी, रमेश धाईत तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos