धक्कादायक : भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह


-  रुग्णसंख्या पोहचली १५५ वर तर आतापर्यंत ७९ जणांनी केली कोरोनावर मात , सध्या सक्रिय रुग्ण संख्या ७६

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
जिल्ह्यात काल ९ जुलै रोजी विक्रमी ४९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात साकोली २७, भंडारा तालुक्यातील ०४, तुमसर०६, लाखनी ११ व पवनी तालुक्यातील एका व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. आतापर्यंत ७९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नवीन रुंगणाची भर पडल्याने जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या १५५ झाली असून सध्या ७६  क्रियाशील रुग्ण आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. काल ४९ नव्या रुग्णाची भर पडली असून जिल्ह्यात आता ७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १५५ एव्हढी आहे. १५२ अहवालाची प्रतिक्षा आहे.
  Print


News - Bhandara | Posted : 2020-07-10


Related Photos