बिग ब्रेकिंग : उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांडातील आरोपी विकास दुबे पोलिस एनकाऊंटरमध्ये झाला ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उज्जैन : मध्यप्रदेशातील महाकाल मंदिर उज्जैन येथे विकास दुबेला अटक केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे नेले जात होते. विशेष पथक विकास दुबेला घेऊन चालले होते. यावेळी ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला असता, विकास दुबे निसटून जाण्याच्या तयारीत असताना त्याचा एनकाऊंटर झाला. जखमी विकास दुबेला जवळील हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तपासानंतर त्याच्या छातीला गोळी लागल्याचे कळते. उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
News - Rajy | Posted : 2020-07-10