१ लाख रूपयांची लाच स्वीकारतांना अजनी पोलिस स्टेशनचा उपनिरिक्षक अडकला एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
प्लाॅटवरील अतिक्रमण हटविण्याचा मोबदला म्हणून १ लाख रूपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अजनी (नागपूर) पोलिस स्टेशनचा पोलिस उपनिरीक्ष राजेशसिंह केशवसिंग ठाकुर (५६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहाथ पकडले. सदर कारवाईमुळे पोलिस विभागात प्रसंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनूसार तक्रारदार हे बोरकर नगर, बारासिग्नल रोड नागपूर येथील रहिवासी असून रेल्वेमध्ये पार्सल ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदाराने ९ सप्टेंबर २०१९  रोजी शताब्दी चौक येथे प्लाॅट खरेदीचा करारनामा केला होता. परंतू सदर प्लाॅटवर गोपालसिंग राजपूत या व्यक्तीने कबाडीचे दुकान लावून अतिक्रमण केले होते. त्याबाबत तक्रारदार हे गोपालसिंग राजपूत यांच्याशी प्लाॅटवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात बोलले असता गोपालसिंग व तक्रारदार यांचे भांडण झाले. याबात तक्रारदार यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन अजनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेशसिंह केशवसिंग ठाकुर यांनी तक्रारदाराच्या शताब्दी चैकातील प्लाॅटवरील अतिक्रमण हटविण्याच्या मोबदला म्हणून ३ लाख रूपये लाचेची मागणी केली. परंतू पोलिस उपनिरिक्षक राजेशसिंह केशवसिंग ठाकुर यांना लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील पोलिस निरीक्षक श्रीमती योगिता चाफले यांनी तक्रादाराने दिलेल्या तका्ररीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारावाईचे आयोजन केले त्यामध्ये आरोपी पोलिस उपनिरीक्षक राजेशसिंह केशवसिंग ठाकुर यांनी तक्रारदाराच्या प्लाॅटवरील अतिक्रमण काढण्याचा मोबदला म्हणून ३ लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख रूपये लाच रक्कम शताब्दी चौक नागपूर येथे पंचासमक्ष स्वीकारली असता पोलिस उपनिरिक्षक यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन अजनी नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्ष ठाकुर यांच्या घराची झडती घेणू सुरू आहे.
सदर कार्यवाही लाचलुचप्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुददलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीमती योगिता चाफले, श्रीमती मोनाली चौधरी, कर्मचारी रविकांत डळाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम व चालक वकील शेख यांनी केली. 
  Print


News - Nagpur | Posted : 2020-07-09


Related Photos