चंद्रपूर येथील अंचलेश्वर वार्डात १० लाख रुपयांचा दारूसाठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक अंचलेश्वर वार्ड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, ८ जुलै रोजी सापळा रचून १० लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळै दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अंचलेश्वर वार्ड परिसरात एक महिन्द्रा कंपनीची पीकअप गाडीमध्ये दारू लपवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता एक महिन्द्रा पीकअप गाडी दिसून आली. सदर ठिकाणी गाडीचा चालक दिसून आला नाही. गाडीमध्ये प्लास्किटचे कॅरेट व त्यामध्ये दारू असल्याचा संशय आल्याने पथकाने सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनात दारू दिसू नये याकरिता भाजीपाला ठेवण्यात येणारे ७० रिकामे प्लास्टिक कॅरेट व त्या मधोमध पोत्यांमध्ये ९० एमएलनी भरलेल्या २८०० बाॅटल देशी दारू आढळून आली. सदर दारू ३ लाख १ हजार रुपये किंमतीची तर दारू ठेवलेले ८ लाख रुपये किंमतीचे वाहन (क्र. एमएच २८ बीबी २८१०) असा एकूण १० लाख १ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हा पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सदर कामगिरी पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, सहायक फौजदार पद्माकर भोयर, पोलिस नाईक प्रकाश बल्की, अमजद खान, पोलिस शिपाई सतीश बघमारे, मिलिंद जांभुळे, नितीन रायपुरे यांनी पार पाडली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-07-08


Related Photos