महत्वाच्या बातम्या

 आठ दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार : वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर


- गडचिरोली शहरातील वनविभागाच्या जागेवर ले-आऊट पाडून विक्री केल्याचे प्रकरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील मध्यभागात असलेल्या सर्व्हे नं.२१ येथील वनजमिनीवर काही भूमाफियांकडून ले-आऊट पाडून परस्पर विक्री करीत असल्याचे बाब उघडकीस आली असून याबाबत विदर्भ न्यूज एक्सप्रेचे प्रतिनिधी वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतले असता याबाबत त्यांनी सांगितले कि वनजमिनीवर कोणीही अशाप्रकारचे कृत्य करीत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून येत्या आठ दिवसांत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांना देणार. आणि यात वनविभागाचे अधिकारी ,कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos