www.mahamesh.Co.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Ahilya Yojna APP व्दारे करता येईल. तरी सदर योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली, डॉ. विलास गाडगे, यांनी केले आहे.

" /> www.mahamesh.Co.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Ahilya Yojna APP व्दारे करता येईल. तरी सदर योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली, डॉ. विलास गाडगे, यांनी केले आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत ग्रामीण परसबाग शेती विकास योजना


- (अहिल्या शेळी योजना) चा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत सन 2022-23 मध्ये राज्यातील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, दारिद्यरेषेखालील, अल्पभुधारक (1 ते 2 हेक्टरपर्यंत भुधारक) प्रवर्गातील 18 ते 60 वर्षे वयोगटातील इच्छुक लाभार्थ्यांना ग्रामिण परसबाग शेळी विकास योजना (अहिल्या शेळी योजना) अंतर्गत शेळी गटाचा (10+1) 90 टक्के अनुदानावर लाभ देण्याची योजना शासनाकडुन सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यीस 10 शेळया व 1 बोकड या प्रमाणे शेळीगटाचा लाभ देण्यात येईल. सदर गटाची प्रकल्प किंमत पुढीलप्रमाणे आहे. (रु.)शेळयांची किंमत प्रति बोकड रु 6000/-, प्रति शेळी रु.5000/- 56000/- 11 नग पशधनाकरीता विमा प्रिमियम 4200/-3 इतर खर्च (पाण्याची भांडी खरेदी, औषध खरेदी इत्यादी) 5800/- एकुण 66000/- लाभार्थीस प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक आहे.
सदर योजनेकरीता इच्छुक अर्जदारांकडुन 10 डिसेंबर 2022 ते 25 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेची पुर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दतीबाबत संपुर्ण तपशिलwww.mahamesh.Co.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Ahilya Yojna APP व्दारे करता येईल. तरी सदर योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली, डॉ. विलास गाडगे, यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos