कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कक्षाबाहेर लावली सॅनिटायझर मशीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या देशात, महाराष्ट्रासह गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अनुषंगाने येथील जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या जिल्हा परिषदेतील कक्षाबाहेर सॅनिटायझर मशीन लावण्यात आली. जिल्हा परिषदेत विविध कामांनिमित्त दररोज अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिक येत असतात. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये आणि पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या हेतुने जिल्हा परिषदेतील अध्यक्षांच्या कक्षाबाहेर सॅनिटायझर मशीन आज, २ जुलै रोजी लावण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती यांची उपस्थिती होती.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-02


Related Photos