गडचिरोली जिल्हयात पुन्हा तिन नवे रूग्ण आढळले : दिवसभरात ५ रूग्णांची नोंद


- एकुण रूग्णसंख्या पोहचली ७२ वर तर आतापर्यंत ५८ जण कोरोनामुक्त , सध्या सक्रीय बाधित रूग्ण १३ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयात आज पुन्हा तिन नवे रूग्ण आढळले आहे. तर आज दिवसभरात एकुण ५ नव्या रूग्णांची नोंद झाली आहेे तर तर एकजण कोरोनामुक्त झाला आहे. 
नव्याने आढळलेले रूग्ण हे धानोरा तालुक्यातील एक ३५  वर्षीय पुरूष तर अहेरी तालुक्यातील २०  वर्षीय महिला व ३१  वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. सकाळी दोन व आता संध्याकाळी तीन नवे रूग्ण आढळल्याने दिवसभरात ५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद जिल्हयात झाली आहे. यामुळे जिल्हातील एकुण बाधितांची संख्या ७२  वर पोहचली आहे तर आतापर्यंत ५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या १३  सक्रीय कोरोनाबाधित रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
धानोरा तालुक्यातील ३१  वर्षीय पुरूष हो कर्नाटक येथून आल्यावर त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते तर अहेरी येथील ३५  वर्षीय महिला हि हैदराबाद येथून जिल्हयात दाखल झाली होती तर दुसरा ३१ वर्षीय पुूरूष हा दिल्ली येथून जिल्हयात दाखल झाला होता, या दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
तर सकाळच्या सुमारास चामोर्शी  व गडचिरोलीी येथील प्रत्येकी एक रूग्णाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तर धानोरा तालुक्यातील एक महिला आज कोरोमुक्त झाली आहे. दरम्यान सकाळी आढळलेल्यामध्ये चामोर्शी तालुक्यातील ३८  वर्षीय महिला पतीसह मुंबई येथून जिल्यात दाखल झाली होती तेव्हा आज तिचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहेे मात्र पतिचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर दुसरा रूग्ण हा गडचिरोली येथील ५१ वर्षीय पुरूष सीआरपीएफ कर्मचारी असनू ते कोलकाता येथून नागपूर मार्गे जिल्हयात दाखल झाले होते. मात्र त्यांची नोंद गडचिरोली जिल्हयातील रूग्णांत केली जाणार नाही. सदर रूग्ग्णाची नोंद औरंगाबाद येथे केलेली आहे. फक्त जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहे. यामुळे तिल्हयात आज जरी ६ रूग्ण आढळून आले असले तरी जिल्हयातील आजची नोंद ५ होणार आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-02


Related Photos