महत्वाच्या बातम्या

 शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत १० कि.मी अंतरावरील मौजा बोरखेडी रेल्वे येथे १४ डिसेंबरला ०२.३० ते ०५.०० वाजतच्या दरम्यान यातील फिर्यादी मनोज दुर्जन मेहुणे (४४) प्लॉट न. ८५ मानेवाड्य रोड जवाहर नगर जि. नागपुर हे महावितरण चोरा येथे काम करत असून त्याचे सहकारी सिदन मौजा बोरखेडी येथे विज बिल नभरलेल्या ग्राहकांची थकबाकीची वसुली व विजजोडणी कापणी करिता गेले, असता आरोपी हरी रामु रावतेल बोरखेड़ा रेल्वे बोरो जि. नागपूर याने विज बिल नभरल्याने विजतोडणीचे काम करित असताना, सरकारी कामात अळथळा आणुन शिवीगाळ करून फिर्यादीला विटेने मारहाण केला. सदर प्रकरणी फिर्यादी याच्या रिपोर्टवरून पोस्ट बोरी येथे आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३३२५०४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आले, असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन बोरी सहायक पोलीस निरीक्षक साखरकर करीत आहेत. 





  Print






News - Nagpur




Related Photos