महत्वाच्या बातम्या

 शबाना खातून यांना निवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : ३१ जुलै २०२२ रोजी ३७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या रफी अहमद किडवई प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ.शबाना खातून यांच्या स्मरणार्थ गुरुवार, १५ डिसेंबर २०२२ रोजी किडवई परिवारातर्फे हार्दिक निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयचे प्रार्चाय सय्यद शफीकुद्दीन, तथा शाळेचे माजी सेवानिवृत्त शिक्षिका हज्जन मुनावर सुलताना, शाळेचे मुख्याध्यापक मो. आरिफ शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु.रिदा फातेमा वकील शेख हिने कुराण पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक रहमान खान, मिसबाह रशीद, हज्जन सादेका बेगम यांनी शाळेच्या हितासाठी शबाना खातून आणि मुनावर सुलताना यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. प्राचार्य सय्यद शफीकुद्दीन आणि मुख्याध्यापक मो. आरिफ शेख यांनी त्यांना किडवाई परिवाराच्या वतीने कपडे व भेटवस्तू दिली. तसेच सेवानिवृत्त शिक्षिका शबान खातून यांनी त्यांच्या वतीने शाळेला महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रतिमा (क्रीम फोटो) भेट दिला. वयाची ५८ वर्षे पूर्ण करून ३१ जुलै रोजी शबाना खातून निवृत्त झाल्या. मात्र शाळेत शिक्षकांची कमतरता भासू नये आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.म्हणुन  5 महिने पगाराशिवाय कोणताही स्वार्थ न ठेवता सेवा केली, त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी हाजी शफिक अहमद व संस्थेचे सचिव ॲड.मो. इक्बाल शेख यांनी सौ. शबाना खातून यांचा सत्कार केला. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केजी, प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संचालन कु. फरहत शमीम, आभार प्रदर्शन सलमान अहमद यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos