सिंदेवाही वनपरिक्षेत्रात घोरपडीची शिकार : सहा जणांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्हयातील वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत उपक्षेत्र सिंदेवाही नियतक्षेत्र कच्चेपार १ मधिल कक्ष क्रमांक २८६मध्ये २४ जून रोजी वनरक्षक एम.आर.कोहळे हे गस्त करीत असतांना सिंदबोडी तलावाजवळ ६ इसम संशयास्पद स्थितीत फिरतांना आढळले. वनरक्षक कोहळे यांनी या सर्व इसमांची चौकशी केली असता त्यांच्या जवळ असलेल्या थैलिमध्ये घोरपड मृत अवस्थेत आढळून आली. याबाबत वनरक्षक कोहळे यांनी विचारपूस केली असता त्यांनी कुत्र्याच्या मदतीने घोरपडीची शिकार केल्याची कबुल केले.  तेव्हा या ६  इसमांना मृत घारेपडीसह अटक करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप मारोती कानकाटे (२३) , शालीक शंकर लोनबले (५०), कमलाकर कवडु लेनगुरे (३९), भास्कर पांडुरंग गुरनुले (२४), संदीप कवडू लेनगुरे (२७), पंकज बंडू जेंगठे (१८ )सर्व रा. खैरीचक असे आरोपींची नावे आहे.
सदर कार्यवाही ब्रम्हपूरी वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजिव कु. रामेश्वरी बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एम.आर.कोहळे यांनी आरोपी विरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अतंर्गत गुन्हा दाखल करून २४ जून रोजी सिंदेवाही न्यायालयात हजर करण्यात आले.  
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-27


Related Photos