गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शाळा सुरू करण्याबाबत घेतली बैठक, अधिकाऱ्यांशी केली सविस्तर चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना महामारीच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालये मार्चपासून बंद करण्यात आली होती. आता चालू शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज, २६ जून रोजी जिल्हा परिषदेमध्ये बैठक बोलावून सविस्तर चर्चा केली. देशासह राज्यात व गडचिरोली जिल्ह्यात कोरोना (कोविड -१९) या महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन लागू करण्यात आले. या महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मार्चच्या दुसरया आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाचिद्यालये व शैक्षणिकी संस्था बंद करण्यात आल्या. मात्र चालू शैक्षणिक सत्रापासून शाळा सुरू करायच्या की नाही, चालू करायच्या झाल्यास त्या केव्हापासून सुरू करायच्या याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-26


Related Photos