कुरखेडा व चामोर्शी तालुक्यातील दोघांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह : रूग्णसंख्या पोहचली ६४ वर


- आतापर्यंत ४६ जण बरे होऊन घरी परतले तर १७ जणांवर रूग्णालयात सुरू आहे उपचार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयात आज पुन्हा दोन कारोनाबाधितांची भर पडली आहे. कुरखेडा तालुक्यातील एका २२ वर्षीय युवकाचा व चामोशी तालुक्यातील एका २५ चर्षाीय युवकाचा अहवाल आज २६ जून रोजी पाॅझिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६४ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ४६  जणांना बरे झाल्यानंतर दवाखाण्यातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर सध्या १७ सक्रीय कोरोनाबाधित रूग्ण असून त्यांच्यावर दवाखाण्यात उपचार सुरू आहे. आज नव्याने आढळलेले दोन्ही रूग्ण हे दिल्ली येथून जिल्यात दाखल झाले होते व त्यानंतर ते दोघेही संस्थात्मक विलगीकरणात होते. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-26


Related Photos