आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ


आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / मुंबई 

            आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल रुपये 2 हजार पर्यंत तर गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील. यासाठी 170 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.  1 जुलै पासून ही वाढ लागू होईल.  सध्या राज्यात ग्रामीण आणि नागरी भागात 65 हजार 740 आशा स्वयंसेविकांची पदे भरलेली आहेत.  
  Print


News - Rajy | Posted : 2020-06-25


Related Photos