माहिती तंत्रज्ञान धोरणास मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / मुंबई  

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहायभूत सेवा धोरण-2015 चा कालावधी नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

हे धोरण 30 जून रोजी संपुष्टात येणार आहे.  नवीन धोरण तयार करण्याची प्रक्रीया ही कोविड विषाणुच्या महामारीमुळे थांबली आहे.  तथापि, उद्योग विभागामार्फत सर्व सबंधित तज्ज्ञ व्यक्तींशी व्हिडिओ कॉन्फरन्स व वेबिनारच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत असून लवकरच या नवीन धोरणाची आखणी करण्यात येणार आहे. 2015 रोजी माहिती तंत्रज्ञान धोरण आखण्यात आले होते त्याची मुदत पाच वर्षांची होती. 
  Print


News - Rajy | Posted : 2020-06-25


Related Photos