चामोर्शी तालुक्यातील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, जिल्हयातील एकुण बाधित संख्या पोहचली ६२ वर


दिल्ली येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली :. चामोर्शी तालुक्यातील २५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल काल सायंकाळी पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी ६२ वर गेली आहे . सदर व्यक्ती  दिल्ली  येथून प्रवास करून चामोर्शी  तालुक्यात आला असता त्यांना  धानोरा येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काल २४ जून  रोजी रात्री उशिरा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला. यामुळे जिल्यातील कोरोनाबधितांची संख्या ६२ वर पोहचली आहे तर सक्रीय रूग्ण संख्या १५ झाली असून त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहे.   आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेले ४६ रुग्ण आहेत.
तर सक्रिय कोरोना बाधित संख्या १५ आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-25


Related Photos