अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नेरी(चिमूर) :
अवैद्य दारू तस्करी वाहनावर कारवाई करून  नेरी पोलिसांनी   १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
आज   २  ऑक्टोबर  रोजी महात्मा गांधी जयंती निमित्याने अवैध दारू जप्त करण्याकरिता पोलीस निरीक्षक   मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण मेश्राम, पोलीस शिपाई कैलास आलाम, सचिन गजभिये हे सकाळी ६ च्या सुमारास खाजगी वाहनाने चिमूर परिसरात पेट्रोलिंग राबवित असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर खांबाडा बस स्टॉप जवळ नाकाबंदी केली असता देशी दारूची अवैध वाहतूक करणारे चार चाकी वाहन   एमएच ४०  केआर ४४३७  हे पोलिसांना लांबूनच पाहून खांबाडा गावातुन वाघेडा जाणाऱ्या बैल गाडीच्या कच्या रस्त्याने पळू लागले. त्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला असता चालकाने धाडस दाखवीत देशी दारूने भरलेले वाहन चक्क नाल्यातील वाहत्या पाण्यातून बाहेर काढून पळून  जाण्याचा प्रयत्न केला . परंतु, समोर शेत शिवारातील पिकास पाणी पुरवठा सुरू असल्याने त्याचे वाहन रस्त्यावरच फसले.  त्याचा प्रयत्न असफल झाल्याने वाहन जागीच ठेवून तो पळून गेला. सदर वाहनांमध्ये देशी दारूने भरलेल्या एकूण ६५ बॉक्स मध्ये प्रत्येकी १०० नग प्रणाने ९० मी ली च्या निपा किंमत ३ लाख २५ हजार रुपयांचा दारू साठा व वाहन १० लाख असा एकूण १३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यातील फरार वाहन चालक व मालक विरुद्ध गुन्हा नोंद करून चिमूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-02


Related Photos