चातगाव वनपरिक्षेत्रातील खुर्सा (नवेगाव) च्या वाहीजवळ आढळला मृतावस्थेत पट्टेदार वाघ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /  गडचिरोली :
गडचिरोली तालुक्यातील चातगाव वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खुर्सा (नवेगाव) च्या शेजारी वाहीजवळ एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे. सदर वाघाची पूर्ण वाढ झालेला असून त्याचे वय अंदाजे ५ ते ७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. या पट्टेदार वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप  स्पष्ट झाली नसून त्या वाघाच्या अचानक मृत्यूच्या कारणांचा शोध वनविभाग घेत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-23


Related Photos