एटापल्ली येथील जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्यास मान्यता : जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वीची विज्ञान शाखा सुरू करण्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली असल्याने गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबद्दल एटापल्ली परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. एटापल्ली येथे ११ वी व १२ वीची विज्ञान शाखा सुरू करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. यासाठी ग्रामस्थांनी ऑगस्ट २०१९ मध्ये शाळा बंद ठेवली होती. या मागणीची दखल घेत अजय कंकडालवार हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. एटापल्ली तालुका हा दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला असून या परिसरातील विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी आणि १२ वीची विज्ञान शाखा सुरू केल्यास गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर शिक्षणाची व्यवस्था होईल याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा मुद्दा नेहमी चर्चेत आणला. अखेर अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून एटापल्ली येथे विज्ञान शाखा सुरू करण्यास गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळै एटापल्ली परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सोय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळााल आहे. जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे चालू सत्रापासून इयत्ता ११ वी व १२ वीची विज्ञान शाखा सुरू करण्यास शिक्षण समितीने ठराव क्रमांक ७/दि. २०/८/२०१९ रोजी अन्वये मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. सदर विज्ञान शाखा मंजूर करण्यासाठी येणाऱ्या खर्चात शिक्षक मानधन प्रतिवर्ष १ लाख ८ हजार प्रमाणे 3 शिक्षकांचे मानधन ३ लाख २४ हजार रुपये, फर्निचर, प्रयोगशाळा इत्यादी व इतर किरकोळ खर्चासाठी अंदाजे ३ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा वार्षिक खर्च जिल्हा निधीतून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली असल्याने या परिसरातील विद्याार्थी, पालक व नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवाार यांचे व जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-23


Related Photos