महत्वाच्या बातम्या

 विज्ञानवादी बौद्ध धम्माचे आचरण करुण जीवनात यशस्वी व्हावेत : आरोग्य सेवक भागेश टेभुर्णे यांचे प्रतिपादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सुमारे अडीच हजार वर्षा पूर्वी तथागत गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेला हा विज्ञानवादी बौद्ध धम्म आहे. यात स्वातंत्र, समता, बंधुता व न्याय ही सर्व सामान्य जनतेच्या हिताची चतुसुत्री आहे . हया चतुसुत्री वर आधारीत असलेल्या बौद्ध धम्माची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना नागपूर येथील पवित्र दीक्षाभुमिवर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो दिवस म्हणजे आजचा हा धम्मचक्र प्रवर्तन दीन होय. हा धम्म जगात सर्वश्रेष्ठ आहे यात विज्ञानवादी दृष्टीकोन आहे. त्यामुळे आपले जीवनात यशस्वी होण्यासाठी ह्या विज्ञानवादी बौद्ध धम्माचे आचरण करावे असे प्रतीपादन रत्नापूर येथे आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यकमात केले.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथे बौद्ध समाज, रमाबाई महीला मंडळ व रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन शाखा रत्नापूर यांचे सयुक्त विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे पुतळ्या जवळ संपन्न झाला. डॉ बाबासाहेब यांचे पूर्णाकृती पुतळ्यास बौद्ध समाज अध्यक्ष सदाशिव शेंडे यांनी मालार्पण  करुण पूजन केले. त्यानंतर तेथुन गावातील मुख्य मार्गाने डीजेच्या नृत्यासह व डॉ. बाबासाहेबाच्या जयघोषासह मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक बसस्टॅड दुर्गा माता चौकात आल्यावर माजी जी. प. सदस्य रमाकांत लोधे सर्व मिरवणुकीत असलेले सहभागी बांधवांना सरबत पाजुन त्यांचे स्वागत केले. त्यांचा हा उपक्रम जवळपास १० ते १२ वर्षापासुन अविरतपणे सुरु आहे .मिरवणुक पुतळ्या जवळ परतआल्यावर कार्यक्रमला सुरवात झाली.

वरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बौद्ध समाज अध्यक्ष सदाशिव शेंडे होते प्रमुख अतिथी म्हणुन आरोग्य सेवक भागेश टेभुर्णे, सामाजीक कार्यकर्ता भालचंद्र लाळे ,आरोग्य सेवक सरीता लाडे, गजानन मेश्राम रमाबाई महीला मंडळ अध्यक्ष दुर्मिला रामटेके, सचिव गीता मेश्राम, रि. वि .फे अध्यक्ष सदानंद मेश्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते. पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन सदाशीव शेंडे यांनी केले तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन भागेश टेभुर्णे यांनी केले. सर्व महापुरुषांचे प्रतीमेचे पूजन करण्यात आले भिमराव मेश्राम यांनी सर्व उपस्थीत जन समुदायाला बौध्द वंदना ग्रहन केली उपस्थीत मान्यवरांनी सुद्धा हा धम्मचक्र प्रवर्तन दीन याबददल सविस्तर विस्तृत मार्गदर्शन केले.वरील कार्यक्रमाचे संचालन शमा सुनिल डेकाटे यांनी केले.तर दिपा मेश्राम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध समाज, रमाबाई महीला मंडळ व रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन शाखा रत्नापूर येथील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमची सांगता करण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos