खेळ व कला गुणातुन प्रशासकीय कामात ऊर्जा मिळेल : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर


- महसूल क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : दैनंदिन कामासोबत आपले व आपल्या कुंटूबियांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे. या महसूल क्रिडा स्पर्धा मधून दैनंदिन आपल्या प्रशासकीय कामात व्यस्त राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळून आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण) गृहनिमार्ण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी महसूल क्रिडा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
जिल्हा क्रिडा संकुल येथे आज पासुन १८ व १९ जानेवारी पर्यंत महसूल क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, दिपक कारंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते यांची मंचावर उपस्थिती होती.
कुठल्याही स्पर्धेमध्ये पुरस्कार महत्वाचा नसून सहभाग महत्वाचा आहे. सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेने खेळाचे प्रदर्शन करुन विभागस्तरावर जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, असे आवाहन डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी केले. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेतून मन शांतीसाठी खेळ महत्वाचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खेळ भावनेने कुठलाही भेदभाव न करता आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे. व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे वान्मथी सी. म्हणाल्या.
महसूल विभाग हा प्रशासनाचा नाक, कान, डोळा म्हणुन ओळखला जातो. अशा या विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहणे तितकेच महत्वाचे आहे. क्रिडा स्पधेतील सहभागातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल, असे जितीन रहमान म्हणाले.
यावर्षीच्या महसूल क्रिडा स्पर्धा आर्वी महसूल विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आल्या आहे. महसूल क्रिडा स्पर्धेत जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, हिंगणघाट व वर्धा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध खेळाच्या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास शिरसाट, यानी व संचालन रेणुका रोटकर यांनी तर आभार तहसिलदार काळे यांनी मानले.
News - Wardha