गेवरा खुर्द येथील युवकाचा खड्यात पडून झाला दुर्दैवी मृत्यू : एकुलता एक मुलगा गमावल्याने कुळमेथे कुटुंबीयांवर पसरली शोककळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली :
पुलाच्या बांधकामाकरिता पाण्यासाठी खोदलेल्या खोल खड्यात तोल जाऊन २५ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सावली तालुक्यातील पाथरी पो. स्टे. हद्दीतील गेवरा खुर्द परिसरातील करोली रस्त्यादरम्यान एका पुलाचे बांधकाम सुरु असून त्या पुलाच्या बांधकामाकरिता  पाण्याची आवश्यकता असल्याने त्याच नाल्यात बाजुला संबंधित कंत्राटदाराकडुन जेसीपीच्या सहाय्याने १० फुट विहिरसदृस्य खड्डा खोदण्यात आला होता. याच खड्यात पडून गेवरा खुर्द येथील २५ वर्षीय युवक प्रशांत दिलीप कुळमेथे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे मृतक प्रशांत सकाळी गावाशेजारील नाल्याकडे शौचास जातो म्हणून सकाळी साडेसहा वाजता घरुन स्वत:च्या सायकलीने निघून गेला. तास दोन तास होऊन मुलगा घरी परत आला नाही म्हणून मृतकाचे वडील दिलीप कुळमेथे यांनी करोली रोडला असलेल्या नाल्याकडे जाऊन शोध सुरु केला असता त्या परिसरात सायकल आढळून आली. त्यामुळे मृतक प्रशांतला आवाज दिले. आवाजाला प्रशांतकडुन काहीही प्रतीसाद आला नाही. सायकल उभी असलेल्या शंभर फुट अंतरावर पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या खड्यातील पाण्यात मृतक प्रशांतच्या चपला तरंगतांना दिसल्याने वडिलाला शंका आली. त्या दरम्यान लोखंडी सळाखीच्या हुकने पाण्यात शोधले असता मृतक प्रशांतचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावातील तंमुस अध्यक्ष हंसराज रामटेके यांनी पाथरी पोलिसांना दिली. तातडीने घटनास्थळ गाठत पाथरी पोलीस स्टेशनचे पीएसआय चव्हान, पोहवा देशमुख, नापोका वडलावार, शिपाई सावे यांनी प्राथमीक तपास करुन स्थळ पंचनामा केला व मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास पाथरीचे ठाणेदार सुनील घारे यांच्या मार्दर्शनात सुरु आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-21


Related Photos